विविध योग शिबीर

 

दरवर्षी मे महिन्यात उन्हाळी सुट्या असल्यामुळे योग शिक्षकांसाठी दहा दिवसीय योग शिबीर आयोजित करण्यात येते . सरकारी कार्यालयात ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी रिफ्रेश कोर्स असतात तद्वतच ही योग शिक्षकांसाठीची विशेष कार्यशाळा असते यामध्ये शिक्षकांकडून योगसाधक म्हणून शिकवण्याचे कौशल्य याबाबत विशेष मार्गदर्शन देण्यात येते या शिबिरांसाठी उपस्थिती खूप चांगली असते . व सर्वजण पुढील वर्षासाठी लागणारी ऊर्जा या शिबीराद्वारे घेऊन जातात असा आमचा अनुभव आहे .
निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रातर्फे वर्षभरात ‍ दर महिन्यात कमीत कमी एक तरी योग शिबिर आयोजित केल्या जाते . यामध्ये उच्च रक्तदाब मधुमेह मणक्यांचे विकार योग परिचय इत्यादी सोबत ऋतू बदलांमुळे होणाऱ्या पचन संस्था तसेच श्वसनसंस्था इत्यादींच्या विकारांवरील उपक्रम योगाभ्यासाची शिबिरे आयोजित करण्यात येतात.

ही सर्व शिबिरे सात ते दहा दिवसांची असतात यामध्ये योग अभ्यासासोबतच तात्त्विक विवेचना द्वारे साधकांचे प्रबोधन करून त्यांची योगसाधने बाबतची वैचारिक बैठक ही पक्की व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात.

याशिवाय वजन कमी करण्यासाठी उपयुक्त योगाभ्यास या अंतर्गत तीन आठवड्यांचे विशेष योग शिबीर घेऊन नंतर सतत त्यांचा पाठपुरावा केल्या जातो. या शिबिरात योगसाधकांना दिनचर्या ऋतुचर्या तसेच आहार-विहार याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.

[supsystic-gallery id=’3′]

योग परिचय शिबीरे २०१८

योग परिचय शिबीरे उत्साहात संपन्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमातील२०१७-१८ या बॅचच्या विद्यार्थ्यांनी परभणी शहरातील पाच विविध भागात ( श्रीकृष्ण गट .स्वामी समर्थ गट. जागृत हनुमान गट .व्यंकटेश मंदिर गट आणि ज्ञानेश्वर माऊली गट. )योगशास्त्राचा परिचय करून देणारे योग परिचय शिबिरे घेतली या शिबिरांमध्ये त्यांनी सूक्ष्म हालचाली तसेच आसन प्राणायाम शुद्धिक्रिया आणि शिथिलीकरण यांची प्रात्यक्षिके तसेच माहितीही देण्यात आली . परभणी शहरात ही योग परिचय शिबीर दिनांक २६ मार्च ते १ एप्रिल २०१८ पर्यंत आयोजित करण्यात आली होती यामध्ये शहरातील एकूण १९० स्त्री आणि पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला .

[supsystic-gallery id=’2′]

विद्यार्थ्यांसाठी योग शिबिर २०१८

मुलांसाठीच्या योग शिबिरांची उत्साहाने सुरुवात निरामय योग प्रसार व प्रचार केंद्र परभणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलांसाठी (वयोगट ८ ते १६ वर्ष ) त्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांना योग शास्त्राबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी दिनांक २२/०४/२०१८ ते २९/०४/२०१८ या कालावधीमध्ये गोरे काका भवन या ठिकाणी आयोजित केले आहे . या शिबिराच्या उद्घाटन हे परभणी शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर बी.एस.मोरेे सर यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योग साधनेची आवश्यकता विषद केली. या योग शिबिरामध्ये योग शिक्षणातून मुलांना आवडेल अशा मनोरंजक वैशिष्टपूर्ण संशोधित पद्धतीने शारीरिक, मानसिक ,बौद्धिक ,भावनिक, अशा सर्वांगीण विकासासाठी आसन ,प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान, योगनिद्रा शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकविली जाईल सोबतच मनोरंजक बौद्धिक खेळ, गाणी, स्तोत्र ,निबंध, कोडी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त गोष्टी यांचा समावेश करण्यात आलेला आहे .

 

[supsystic-gallery id=’4′]