निरामय वर्धापन दिन

निरामय वर्धापन दिन २०१८

परभणी येथील निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राचा 11 वा वर्धापन दिन 6 व 7 ऑक्टोबर या दिवशी जालना येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या वर्धापन दिनानिमित्त 2 दिवशीय योग संमेलनाचे आयोजन केले गेले.
मे महिन्यात श्री. निरंजन वेलणकर यांनी परभणी, जालना, औरंगाबाद आणि बुलढाणा अशा चार जिल्ह्यांमध्ये ‘योग ध्यान सायकल वारी’ केली होती. या सायकल वारीमध्ये त्यांनी अनेक गावांमध्ये जाऊन योगसाधकांच्या भेटी घेतल्या होत्या. या योगसाधकांना एकत्रित करण्यासाठी आणि योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या योग संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या संमेलनाचे उद्घाटन प्रशांतानंद सरस्वती (प्रा. डॉ. प्रशांत पटेल) यांनी केले. त्यांनी योगसंस्थाचा समन्वय- काळाची गरज या विषयावर भाष्य केले.
या संमेलनात अनेक चर्चात्मक सत्रे, अनुभव कथन, योग संशोधनाचे सादरीकरण, भजन संध्या, प्रात्यक्षिक सत्र, ध्यान, योगनिद्रा सत्र पार पडले.
कार्यक्रमाचा समारोप दुसऱ्या दिवशी डॉ. गिरीश वेलणकर यांच्या मार्गदर्शनाने झाला.
या संमेलनासाठी निरामय योग केंद्र, परभणी, चैतन्य योग केंद्र, जालना, स्वामी विवेकानंद योग केंद्र, औरंगाबाद, पतंजली योग पीठ, आदित्य सेवा संघ, मंठा, तसेच मेहकर, सिंदखेडराजा, अंबड, मानवत येथून 123 योगसाधक व योगशिक्षक उपस्थित होते.

[supsystic-gallery id=’8′]

 

निरामय वर्धापन दिन २०१७

 

२३ सप्टेंबर हा निरामय योग प्रसार व संशोधन संस्थेचा वर्धापन दिन आहे या निमित्ताने दरवर्षी योग संमेलन आयोजित केले जाते.आतापर्यंत या अंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील योग संस्थांचे योग संमेलन मराठवाडातील योग संस्थांचे संमेलनतसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाराष्ट्रातील संस्थांचे संमेलन इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे.सन २०१७ मध्ये बृहद निरामय योग शिक्षक संमेलनं आयोजित करून आतापर्यंत निरामय तर्फे योगशिक्षक पदविका प्राप्त केलेल्या सर्व योग शिक्षकांचे एकत्रीकरण करून योगसाधनेच्या मार्गावरील वाटचालीबाबत तसेच योगाच्या प्रसारासाठी करावयाच्या प्रयत्नांबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली या विविध संमेलनात आतापर्यंत विशेष उल्लेख करावे असे नागपुरातील जनार्दन योगाभ्यासी मंडळ घंटाळी मित्र मंडळ ठाणे येथील वरिष्ठांनी व मुक्त विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले आहे.

[supsystic-gallery id=7]