गुरुपोर्णिमा उत्सव

 

दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष समारंभाचे आयोजन केले जाते या अंतर्गत समाजातील प्रतिष्ठित व आदरणीय गुरुतुल्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाने समाजप्रबोधन घडविले जाते या कार्यक्रमात योग्य शिक्षकांसोबतच निरामयच्या संपर्कात आलेले जे योगसाधक आहेत त्यांचे एकत्रीकरण या निमित्ताने करण्यात येते व निरामयच्या मार्गदर्शनाखाली योग शिकल्यामुळे जे अनुभव आले त्या अनुभव कथनाचा कार्यक्रम घेतला जातो.

गुरुपोर्णिमा उत्सव २०१८

 

निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रातर्फे गुरुपौर्णिमेचा उत्सव उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी बाळू गुरू असोलेकर यांचे ‘गुरू’ या विषयावर प्रवचन झाले. प्रवचनामध्ये ते म्हणाले की आपले शरीर व मन निरोगी राहण्यासाठी योगाभ्यासाची अत्यंत आवश्यकता आहे. मानवी जीवनात अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरुकृपेची आवश्यकता असते. जीवनामध्ये तणावरहित राहता आले पाहिजे. चांगली गोष्ट घडल्यानंतर भगवंताच्या कृपेने घडली आहे आणि वाईट घडल्यानंतर भगवंताची इच्छा आहे असे समजावे म्हणजे आपण तणावमुक्त राहू शकतो.
कार्यक्रमाचा प्रारंभ सद्गुरू वंदनेने झाला. त्यानंतर निरामय चे अध्यक्ष डॉ. अनिल रामपूरकर यांनी प्रास्ताविक केले.
या उत्सवात अनेक साधकांनी आपले योग अनुभव कथन केले.
कार्यक्रमाचा समारोप निर्वाण षटक याने झाला.
या उत्सव प्रसंगी अनेक योगशिक्षक तसेच योगसाधक उपस्थित होते.

[supsystic-gallery id=’6′]