निरामयचे तीन महत्त्वाचे उपक्रम

 

निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रामार्फत नियमित उपक्रमांसोबतच दरवर्षी प्रामुख्याने तीन वार्षिक उपक्रम साजरे केले जातात.यामध्ये रथसप्तमी निमित्त दरवर्षी सूर्यनमस्कार महाअभियान राबवले जाते. या अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी सूर्यनमस्काराचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यासाठी तीन दिवसीय शिबीरे आयोजित केली जातात व रथसप्तमीच्या दिवशी शासकीय यंत्रणेसोबत सहयोग ठेवून शहरातील मुख्य क्रीडा संकुलात सामुदायिक सूर्यनमस्कार घातले जातात.तसेच वर्तमानपत्रातील लेख., आकाशवाणीवरील प्रसाराने तसेच शाळांमध्ये देण्यात येणारी व्याख्याने या विविध उपक्रमांद्वारे सूर्यनमस्कार हा प्रकृती स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे अशा या आसनाधिष्ठित व्यायाम प्रणालीचा प्रचार व प्रसार साधला जातो.

२३ सप्टेंबर हा निरामय योग प्रसार व संशोधन संस्थेचा वर्धापन दिन आहे या निमित्ताने दरवर्षी योग संमेलन आयोजित केले जाते.आतापर्यंत या अंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील योग संस्थांचे योग संमेलन मराठवाडातील योग संस्थांचे संमेलनतसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाराष्ट्रातील संस्थांचे संमेलन इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे.सन २०१७ मध्ये बृहद निरामय योग शिक्षक संमेलनं आयोजित करून आतापर्यंत निरामय तर्फे योगशिक्षक पदविका प्राप्त केलेल्या सर्व योग शिक्षकांचे एकत्रीकरण करून योगसाधनेच्या मार्गावरील वाटचालीबाबत तसेच योगाच्या प्रसारासाठी करावयाच्या प्रयत्नांबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली या विविध संमेलनात आतापर्यंत विशेष उल्लेख करावे असे नागपुरातील जनार्दन योगाभ्यासी मंडळ घंटाळी मित्र मंडळ ठाणे येथील वरिष्ठांनी व मुक्त विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले आहे

दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष समारंभाचे आयोजन केले जाते या अंतर्गत समाजातील प्रतिष्ठित व आदरणीय गुरुतुल्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाने समाजप्रबोधन घडविले जाते या कार्यक्रमात योग्य शिक्षकांसोबतच निरामयच्या संपर्कात आलेले जे योगसाधक आहेत त्यांचे एकत्रीकरण या निमित्ताने करण्यात येते व निरामयच्या मार्गदर्शनाखाली योग शिकल्यामुळे जे अनुभव आले त्या अनुभव कथनाचा कार्यक्रम घेतला जातो

दरवर्षी मे महिन्यात उन्हाळी सुट्या असल्यामुळे योग शिक्षकांसाठी दहा दिवसीय योग शिबीर आयोजित करण्यात येते . सरकारी कार्यालयात ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी रिफ्रेश कोर्स असतात तद्वतच ही योग शिक्षकांसाठीची विशेष कार्यशाळा असते यामध्ये शिक्षकांकडून योगसाधक म्हणून शिकवण्याचे कौशल्य याबाबत विशेष मार्गदर्शन देण्यात येते या शिबिरांसाठी उपस्थिती खूप चांगली असते . व सर्वजण पुढील वर्षासाठी लागणारी ऊर्जा या शिबीराद्वारे घेऊन जातात असा आमचा अनुभव आहे .
निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रातर्फे वर्षभरात ‍ दर महिन्यात कमीत कमी एक तरी योग शिबिर आयोजित केल्या जाते . यामध्ये उच्च रक्तदाब मधुमेह मणक्यांचे विकार योग परिचय इत्यादी सोबत ऋतू बदलांमुळे होणाऱ्या पचन संस्था तसेच श्वसनसंस्था इत्यादींच्या विकारांवरील उपक्रम योगाभ्यासाची शिबिरे आयोजित करण्यात येतात

ही सर्व शिबिरे सात ते दहा दिवसांची असतात यामध्ये योग अभ्यासासोबतच तात्त्विक विवेचना द्वारे साधकांचे प्रबोधन करून त्यांची योगसाधने बाबतची वैचारिक बैठक ही पक्की व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात

याशिवाय वजन कमी करण्यासाठी उपयुक्त योगाभ्यास या अंतर्गत तीन आठवड्यांचे विशेष योग शिबीर घेऊन नंतर सतत त्यांचा पाठपुरावा केल्या जातो या शिबिरात योगसाधकांना दिनचर्या ऋतुचर्या तसेच आहार-विहार याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते