योगशिक्षक पदविका :

परभणी येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकतर्फे घेण्यात येणारा “योगशिक्षक पदविका” अभ्यासक्रम ‘राष्ट्रीय स्वयं संघ जनकल्याण समिती’ यांचेकडून घेण्यात येतो. सदरील योगशिक्षक पदविकेचा अभ्यासक्रम शिकविण्याचे नियोजन मात्र निरामय योग संस्थेकडे आहे.

सेवाभावी कार्य :

निरामय योग संस्थेतील तज्ञ शिक्षकांनी “योगशिक्षक पदविका” अभ्यासक्रमाची धुरा आपल्या खांद्यावर पेलली आहे व विशेष म्हणजे कोणीही योग शिक्षक या कामासाठी कोणत्याही स्वरूपांत मानधन घेत नाही. सर्व शिक्षक सेवाभावी वृत्तीने कार्य पार पाडतात

तज्ञ योग शिक्षक :

निरामय संस्थेकडून आजपर्यंत अकरा वर्षांत जवळपास योगशिक्षक तयार केले गेले आहेत त्यापैकी ५० शिक्षक तज्ञ प्राध्यापक म्हणून शिकवण्याचे काम करीत आहेत या संस्थेच्या दरवर्षीच्या निकालावरून ( ९५ ते ९६ % निकाल ) प्राध्यापकांची गुणवत्ता सिद्ध होत आहे यापैकी शिक्षकांनी एम. एस्सी. (योगा) चा अभ्यासक्रम बंगळुरू येथील “स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान” मधून पूर्ण केला आहे

योग पदविका :

नाव :: योगशिक्षक पदविका
विषय संकेतांक :: P-126
संस्था संकेतांक :: 8732-A
संस्थेचे नाव :: रा. स्व. संघ जनकल्याण समिती, परभणी

प्रवेशासाठी आवश्यक गुणवत्ता :

१) बारावी उत्तीर्ण अथवा
२) बारावी समकक्ष मुक्त विद्यापीठाचा कोणताही अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा अथवा
३) मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

प्रवेशासाठी आवश्यक बाबी

१) जन्म तारखेचे प्रमाणपत्र म्हणून शाळा सोडण्याचा दाखला अथवा (ट्रिक) पासचे प्रमाणपत्र
२) आधार कार्ड / निवडणूक ओळखपत्र म्हणून
३) पासपोर्ट साईज २ फोटो
४) डॉक्टरांचे प्रमाणपत्र (योगसाधना करण्यास सक्षम असल्याचे)
७) प्रवेश प्रक्रिया::
ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज कोणत्याही नेटकॅफे वरून अथवा स्वतःच्या कॉम्प्युटरवरून भरता येतो

प्रवेश शुल्क

१) मुक्त विद्यापीठाचे शुल्क १५००/- ऑनलाइन बँकिंगवर द्वारे भरावे लागते
२) संस्थेचे शुल्क रुपये ५०००/- ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर संस्थेकडे जमा करावे लागते
३) संस्थेच्या शुल्कांमध्ये अभ्यासक्रमास लागणारी पाच पुस्तके विनामूल्य देण्याची प्रथा आहे

प्रवेशाचा कालावधी :

दरवर्षी साधारणतः १५ जून ते प१५ ऑगस्ट दरम्यान असतो, व विलंब शुल्कासह १५ सप्टेबरपर्यंत रुपये १००/- ज्यादा भरून. शुल्कात विद्यापीठाच्या धोरणानुसार वाढ होऊ शकते.