योगाची मुळाक्षरे

योग मार्गावर नवीन प्रवास सुरू केलेल्या योग जिज्ञासूंसाठी अतिशय उपयुक्त असे पुस्तक , ज्यात आसन पूर्व सर्व हालचालींचा समावेश रंगीत छायाचित्रांसहित केला आहे .

विक्रीमूल्य:- १००

 

 

योग सिद्धांत

योगशास्त्राचा मूळ सिद्धांतांचा समावेश प्रस्तुत पुस्तकात करण्यात आला आहे. ज्यात योगशास्त्राचे स्वरूप, अष्टांग योग दर्शन, आसने-योगीक दृष्टिकोन, प्राणायाम-योगीक, दृष्टीकोन, योग श्लोक इत्यादींचा समावेश समावेश केलेला आहे.
( यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या योगशिक्षक पदविका शिक्षणक्रमासाठी तसेच योग शास्राच्या शिक्षकांसाठी व जिज्ञासू अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक ).

 

विक्रीमूल्य:- ६०

शरीरशास्त्र

योगशास्त्रातील विविध क्रियांमध्ये शरीराचा सहभाग पूर्ण शरीराची शास्त्रोक्त माहिती (anatomy) पेशी अस्थी संस्था अभिसरण संस्था संस्था संस्था श्वसन संस्था पचन संस्था उत्सर्जन व जनन संस्था संस्था अंतस्त्रावी ग्रंथी संस्था या पुस्तकात देण्यात आली आहे सोबतच आयुर्वेद मूलतत्त्वे आहार विहार आरोग्य संकल्पना इत्यादींचा समावेश केला आहे.

विक्रीमूल्य:- ६०

 

 

शिक्षणशास्त्र

आदर्श योग शिक्षकांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पैलूंचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे . यात शिक्षणासंबंधित सर्व बाबी सविस्तरपणे दिलेल्या आहेत. यात योग शिक्षणाचे उद्दिष्टे योगशिक्षण पद्धती वातावरण निर्मिती आदर्श योगशिक्षक पाठ संकल्पना प्रार्थना व उपासनेचे महत्त्व वर्ग संचालन शैक्षणिक साहित्य व परिणामकारक उपयोग व्यक्तिमत्त्व विकास मानसिक स्वास्थ या सर्व पैलूंचा विस्ताराने अभ्यास करण्यात आला आहे.

 

विक्रीमूल्य:- ६०

 

 

 

योगाभ्यास लेखी

या पुस्तकात योगाभ्यासाची पूर्वतयारी योगासनाचे लाभ व परिणाम प्राणायामाचे लाभ परिणाम बंध व मुद्रा लाभ व परिणाम योगिक शुद्धिक्रिया लाभ व परिणाम योगाभ्यास आणि व्यायाम तौलनिक अभ्यास या विषयांचा अंतर्भाव केला आहे.

विक्रीमूल्य:- ६०

 योगाभ्यास प्रारंभिक

आसने प्राणायाम मुद्रा व बंध शुद्धिक्रिया यांचा प्रारंभिक अभ्यास नेमका कसा करावा या विषयी शंका गैरसमज दूर करायचा प्रयत्न या पुस्तकात केला गेला आहे .
यात योगशिक्षक अभ्यासक्रमातील सर्वानी प्राणायाम बंध मुद्रा व शुद्धिक्रिया समावेश सचित्र करण्यात आला आहे

 

 

विक्रीमूल्य:- ६०/-

 

सूर्यनमस्कार

निरामयच्या प्रमुख उपक्रमांपैकी रथसप्तमीनिमित्त सूर्यनमस्कार शिबिराचे आयोजन करणे हा एक प्रमुख उपक्रम होय त्या दृष्टिनेच सूर्यनमस्काराविषयी शास्त्रोक्त माहिती आसनांचा क्रम विविध पद्धती तसेच त्याचे लाभ व परिणाम यांची इत्थंभूत माहिती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तसेच रथसप्तमी इतिहास सूर्यनमस्कार परिचय पूरक हालचाली व सूर्यनमस्कारांतील आसने यांचा सुद्धा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.

विक्रीमूल्य:- १००/-

आरोग्य मणक्यांचे

निरामयच्या सर्वात जास्त मागणी असणाऱ्या पुस्तकांपैकी एक अधुनिक जीवनशैलीत सतत समोर झुकून केल्या जाणार्या जास्तीत जास्त हालचाली होतात. परिणामत: मानेचे, पाठीचे विकार वाढलेले आहेत त्यामुळेच अशा रुग्णांवर संशोधन करून मणक्यांच्या विकारांसाठी योगिक अभ्यासक्रम विकसित करण्यात आला. त्याचा लाभ अनेक रुग्णांनी घेतल. त्यातूनच प्रेरणा घेऊन आरोग्य मणक्यांचे या पुस्काचे निर्मिती करण्यात आल.

 

विक्रीमूल्य:- १००/-

 

दम्यावर योगिक उपचार

निरामायच्या सर्वात जुना संशोधन प्रकल्प, हा दम्यावरील रुग्णांसाठी १९९० झाली सुरू करण्यात आला ज्यात आजतागायत हजारो रुग्णांनी याचा लाभ घेऊन या त्रासदायक आजारातून आपली सुटका करून घेतली आहे व तो प्रकल्प अव्याहतपणे आजही सुरू आहे या पुस्तकात दम्यावर उपयुक्त हालचाली आसने प्राणायाम व शुद्धिक्रिया सोबतच श्वसनसंस्थेचा परिचय दमा या व्याधींचा परिचय करून देण्यात झाला आहे

विक्रीमूल्य:- ६०/-

 विविध व्याधींसाठी योगिक अभ्यासक्रम

 

प्रत्यक्ष योग शिक्षण देताना किंवा एखाद्या व्याधीवर योग उपचार करताना कोणते योग प्रकार शिकावावेत यासाठी ४० वर्षांचा

अनुभव व संशोधन आधारित अभ्यासक्रम या पुस्तिकेत सचित्र देण्यात आले आहेत. तसेच यात प्रार्थना व शांती पाठ यांचाही समावेश करण्यात आला असून एकूण २० प्रकारचे व्याधी व इतर अभ्यासक्रम या पुस्तकात देण्यात आले आहेत. ज्यात उच्च रक्त दाब, मुतखडा, पोटाचे विकार, स्थौल्य, मधुमेह, दमा, तणाव नियंत्रण इत्यादी व्याधींचा समावेश आहे.

विक्रीमूल्य:- ६०/-

योग जिज्ञासा ( मुद्रा विज्ञान विशेषांक)

मुद्राशास्त्र हा योगाचा एक भाग आहे. आपल्या हातापायांच्या बोटांच्या विशिष्ट हालचालीने आपली शरीरावर नियंत्रण ठेवता येते. अनेक प्राचीन संहितांमध्ये मुद्रांचे वर्णन आढळते. या मुद्रा विद्यानाची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. यात मुद्रांचा परिचय, त्यांचे वर्गीकरणविविध मुद्रा व त्याचे साधकांना आलेले अनुभव यांचा सुद्धा समावेश सदरील पुस्तकात केला आहे.

विक्रीमूल्य:- ५०/-