निरामय च्या‌ वार्षिक योग शिक्षक शिबीराची सांगता

दि.१२ मे २०१९ रोजी निरामय च्या‌ वार्षिक योग शिक्षक शिबीराची सांगता झाली.अभ्यासपूर्ण आखलेला अभ्यासक्रम, उत्कृष्ट नियोजन आणि तितक्याच ताकदीने केलेली त्याची अंमलबजावणी असं काहीसं ह्या वेळेसचं योग शिक्षक शिबीर होतं. योगाभ्यास, प्राणायाम, अंतरंग योग व तात्विक विवेचनाच्या माध्यमातून हे शिबिर परिपूर्ण कसे होईल याचा प्रयत्न सर्वांनीच केला. शिबीर यशस्वी होण्यासाठी अविरत राबणारे हात तर होतेच पण त्यामागे असलेली सामूहिक इच्छाशक्ती आणि निरामय विषयीचं निरंतर प्रेम पदोपदी प्रतीत झालं. शबिराचे फलित सहभागी असलेल्या योग शिक्षकांना जाणवले असणारच! पण परगावी असलेल्या निरामय परिवारास देखील प्रेरणा आणि दिशा देणारं हे शिबीर होतं. Thanks to what’s app.सहभागी होऊ न शकलेल्यांना घरपोच शिबिराचा अनुभव मिळाला.
तात्विक विवेचनाचे सुंदर विषय आणि त्यांची योगशिक्षकांनी केलेली सहज उकल हे ह्या वर्षीच्या शिबीराचे ठळक वैशिष्ट्य.
याच सत्रातील अंतिम पुष्प आदरणीय डॉ. वेलणकर सरांनी गुंफले.” जीवनाची दिशा ” असा व्याख्यानाचा विषय .शिबीराचा आढावा घेत सरांनी छोटी छोटी उदाहरणं देऊन खूप गंभीर विषय तेवढ्याच सहजतेने आणि आस्थेने मांडला. ऐकून अंतर्मुख व्हायला नक्कीच झालं आणि चूक काय आणि बरोबर काय चे निकषही बदलले. ‘खरंच आपण योग्य दिशेने वाटचाल करतोय का?’ असा प्रश्न पडला असेल तर नक्की ऐका आणि इतरांबरोबरही शेअर ही करा. आॅडीओसाठीची लींक दुसर्या पोस्टद्वारे शेअर करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.