योगशिक्षक योगशिबिर २०१९

हरि🕉
सामुदायिक साधनेचे फायदे प्राप्त व्हावेत,येत असलेल्या योगाभ्यासाकडे पाहण्याची नवीन दृष्टी निर्माण व्हावी, कांही नवीन गोष्टी शिकावयास मिळाव्यात, आपणाकडून साधने दरम्यान होत असलेल्या चुकांची दुरुस्ती व्हावी इ. व असे अनेक हेतू समोर ठेऊन निरामय दरवर्षी ‘योगशिक्षक योगशिबिर’ आयोजित करतं.
खास योगशिक्षकांसाठी असलेल्या ह्या शिबिरात आसन, प्राणायाम, अंतररंग योग, विविध विषयांवरील तात्त्विक विवेचनं इ. चा समावेश असतो.
एरवी योग शिकविण्यात रममाण असणारे योग शिक्षक विद्यार्थी होऊन ज्ञान टिपण्यासाठी ह्या शिबिराची आतुरतेने वाट पाहतात.स्वतःच नाणं तपासून पहाण्यासाठी आणि अंतर्मनात डुबकी मारायची ही एक सुवर्ण संधीच..

योगशिक्षक योगशिबिर २०१९ ची सुरुवात २ मे पासून झाली.त्यातील काही क्षणचित्रे.

Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published.