वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे प्राध्यापक असलेले प्रा. डॉ. प्रशांत पटेल हे बिहार योग विद्यालयाच्या व कालांतराने बिहार योग विद्यालयाचे संस्थापक परमहंंस स्वामी सत्यानंद सरस्वतींच्या संपर्कात आले व त्यांनी योगाभ्यासाला प्रारंभ केला,त्यांनी  नंतर परमहंंस स्वामी सत्यानंद सरस्वतींकडून कर्मसंन्यास दिक्षाही घेतली.स्वामीजींच्या प्रेरणेनेच डॉ. पटेल यांनी 1978 मध्ये परभणी येथे योगवर्ग सुरू केले व योग मित्र मंडळाची स्थापना केली.

तेंव्हापासून योग मित्र मंडलाद्वारा योग वर्गाबरोबरच निरोगी व्यक्ती व विविध व्याधींचे रुग्ण यांच्यासाठी योग शिबिरे, नेती, कुंजल व लघुशंखप्रक्षालन या शुद्धीक्रियांची शिबिरे, मतिमंद मुले, दम्याचे रुग्ण, शालेय विद्यार्थ्यांचा योगातून व्यक्तिमत्व विकास अशा विविध विषयांवर संशोधन प्रकल्प, या संशोधनावर आधारित  शोध निबंधांचे राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय योग परिषदांंमध्ये सादरीकरण असे विविध उपक्रम सुरू झाले. या विषयांशी संबंधित योग साहित्याचे सुसज्ज ग्रंथालयही सुरू करण्यात आले.

2006 मध्ये रा.स्व.संघ जनकल्याण समितीला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या योग शिक्षक पदविका शिक्षणक्रमाचे अभ्यासकेंद्र मिळाले व जनकल्याण समितीने या शिक्षणक्रमातील योग प्रशिक्षणाचे व अध्यापनाचे काम  योग मित्र मंडळाकडे सोपवले. आजपर्यंत 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हा शिक्षणक्रम पूर्ण केला आहे.

सतत वाढत्या कार्यकक्षा लक्षात घेऊन ‘योग मित्र मंडळ’ या अनौपचारिक मंडळाचे रुपांतर नोंदणीकृत विश्वस्त संस्था म्हणून ‘निरामय योगप्रसार व संशोधन केंद्र’ या संस्थेत करण्यात आले.

2013 मध्ये केंद्र शासनाकडून सुरू करण्यातआलेल्या ‘स्वामी विवेकानंद स्वास्थ्यकेंद्र’ योजनेसाठी परभणी जिल्ह्यासाठी सस्थेची निवड करण्यात आली. 1978 पासून आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून 5000 पेक्षा अधिक व्यक्तींनी विभिन्न उपक्रमातून योग प्रशिक्षण घेतले आहे. संस्थेने योगविषयक 35 पेक्षा जास्त दर्जेदार ग्रंथ प्रकाशित केले आहेत.


आमचे स्वप्न:

प्रशिक्षित, अनुशासित आणि समर्पित योगशिक्षकांच्या माध्यमातून योगाची प्रभावी व सशक्त चळवळ गतिमान करणे. या चळवळीच्या माध्यमातून समाजाला आजच्या चिंताजनक स्थितीतून एका आरोग्यसंपन्न, सुखी व आलोकित समाजात परिवर्तीत करणे.

आमचे ध्येय:

योग मार्गावरील जिज्ञासू साधकांना योगप्रशिक्षण देणे, तसेच विविध व्याधींनी ग्रस्त रुग्णांवर योगोपचार करणे. भारतातील प्राचीन व समग्र अशा योगशास्त्राचा समाजात प्रसार करून त्याद्वारे आज समाजासमोर असलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करून समाजाला प्रगतीपथावर नेणे. योगाच्या संदर्भात;संशोधन करणे.

आमची कार्यकारिणी

डॉ.अनिल रामपूरकर

 

अध्यक्ष

 

डॉ. धीरज देशपांडे

 

उपाध्यक्ष

 

श्री. लक्ष्मिकांत पाथरीकर

 

उपाध्यक्ष

 

श्री. राहुल झांबड

 

सचिव

 

सौ. कल्पना कुंडीकर

 

सहसचिव

 

श्री. प्रशांत जोशी

 

कोषाध्यक्ष